कलाशिक्षक अमोल काळे यांच्या मार्गदर्शनात विश्वजा देशमुख, आयुषी ताजने, भावना जाधव, अंजली घुगे, शिवानी देशमाने, जान्हवी चौधरी, पल्लवी वानखेडे, सुुषमा राऊत, खुशी कुटे, आकांक्षा पवार, श्रुती लहाने, नंदिनी वानखेडे, भूमिका ढोकने, उमा काटकर, करुणा पोधाडे, वैष्णवी मर्दाने, मुक्ता वानखेडे, वेदांती वाघ, खुशी तोंळबे, श्रेया झुंजारे, भूमी यादव, सृष्टी पायघन, दिव्या लहानकर, पायल ढेकने, अमन लहाने, रोशन बाजड, ऋषिकेश राठोड, प्रणय राठोड, वंश मुंदरे, सोहम निकम, प्रणव कोल्हे, स्वप्निल साळसुंदर, कृष्णा महाले या विद्यार्थ्यांनी ‘रस्ता सुरक्षा’ या विषयावर विविध चित्रे रंगविली. वाहतुकीचे नियम, वाहनाची वेगमर्यादा, हेल्मेटचा वापर, रस्ता सुरक्षा जीवन रक्षा आदी संदेश या चित्रांव्दारे विद्यार्थ्यांनी दिले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक अनिल कदम, नितीन गीते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहर वाहतूक शाखेचे नागेश मोहोड, रवी खडसे, प्राचार्य बी.के. बिल्लारी, शिक्षक माळी व कलाशिक्षक अमोल काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी चित्रांमधून दिला वाहतूक नियम पाळण्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:41 AM