पक्ष्यांसाठी चिमुकल्यांची धडपड; झाडांवर लावले जलपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 04:25 PM2018-03-20T16:25:55+5:302018-03-20T16:25:55+5:30
एस.एम.सी. इंग्लीश स्कूल येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात पक्षांना रणरणत्या उन्हापासून संरक्षण आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जलपात्रांची उभारणी करण्यात आली.
वाशिम : २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून संपुर्ण भारत देशात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुन स्थानिक एस.एम.सी. इंग्लीश स्कूल येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात पक्षांना रणरणत्या उन्हापासून संरक्षण आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जलपात्रांची उभारणी करण्यात आली. सध्या पृथ्वी वरील वाढते तापमान झपाट्याने होत असलेले आधुनिकीकरण , यांत्रीकीकरण आणि निसर्गाचा दुष्परिणाम यामुळे गंभीर परिस्थिती निमाृण होत आहे. सोबतच सध्याच्या रासायनिक किटकनाशकांचा व खतांचा अतिवापर यामुळे पक्षांची संखया णपाट्याने कमी होत आहे. त्यातच मोबाईल टॉवर इंटरनेटच्या अतिवापरामुळे आणि त्यातुन निघणाºया लहरींचा फटका पक्षांना बसत आहे. प्रत्यक्षात दिसणारा पक्षी चिमणी आता फक्त् लहान मुलांना चित्रातच दिसण्याची वेळ आली आहे. पक्षी हा निसार्गाचा अतिशय महत्वाचा घटक असुन तो पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याचा एक महत्वाचा दुवा आहे. या सर्व बाबी लक्षात घेवुन राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इकोक्लबच्या माध्यमातुन शाळेच्या परिसरात जलपात्राची उभारणी केली असुन पक्षांना दाणे व पाण्याची व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी आपल्या धराच्या छतावर व आजुबाजुच्या परिसरात या उन्हाळ्यात पाण्याचे छोटेसे भांडे ठेवावे व पक्षांना दाणे टाकावेत यामुळे पक्षांच्या कमी होणाºया संख्येला आळा बसणार आहे. तसेच त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन शाळेच्या प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी आणि हरित सेनेचे चिमुकले दिशा अग्रवाल, विदुला वाघ, सानिका गोरे, खुशी चौधरी, दिशा दायमा, अनिकेत चव्हाण, रिझा हुसेन, धनंजय काकडे, विशाल वानखेडे, पार्थ वानखेडे, श्रेयश कुळकर्णी, अनुष्का जोशी, वेदश्री देशमाने, सुमित वाकुडकर, नेहा वानखेडे, करण तिवारी, दुर्गीश घनोकार यांनी केले आहे.