शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

दृष्टीदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 5:28 PM

दृष्टीदोष आढळून येणाºया विद्यार्थ्यांना आरोग्य विभागातर्फे मोफत चष्मे देण्यात येणार आहेत.

- संतोष वानखडेवाशिम : राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील ६ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. दृष्टीदोष आढळून येणाºया विद्यार्थ्यांना आरोग्य विभागातर्फे मोफत चष्मे देण्यात येणार आहेत.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सहा ते १८ वयोगटातील सर्व शालेय मुलांची वर्षातून एका आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये जन्मत: व्यंग, आजार, जीवनसत्वांची कमतरता व अपंगत्व याचे निदान व उपचार केले जातात. आरोग्य तपासणीसाठी जवळपास ११९५ वैद्यकीय पथके स्थापन करण्यात आली आहेत. राज्यात शासकीय व निमशासकीय मिळूण एकूण ८१ हजार ५५६ शाळा असून, त्यामध्ये शिकणाºया मुलांची संख्या १ कोटी २१ लाख ६७ हजार ५८५ आहे. गत दोन वर्षातील तपासणीदरम्यान साधारणत: ८ टक्के मुलांमध्ये दृष्टिदोष आढळून आले. विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोषाचे प्रमाण अधिक असल्याने वाचन, लिखाण व अभ्यास आदी शैक्षणिक बाबींवर याचा विपरित परिणाम होत असल्याने, दृष्टिदोष आढळून येणाºया गरजू विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्रापासून आरोग्य विभागातर्फे मोफत चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम