यशने जिल्ह्याचा लौकिक वाढविला -सुभाष राठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:34+5:302021-07-24T04:24:34+5:30
आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या वाशिम अर्बन बँकेने यश मारोती इंगोलेला ...
आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या वाशिम अर्बन बँकेने यश मारोती इंगोलेला आर्थिक पाठबळ म्हणून ३१ हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. बँकेचे मानद अध्यक्ष सुभाष राठी, अध्यक्ष सुरेश लोध, मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल खंडेलवाल यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला. यश इंगोले याला गिर्यारोहणाची आवड असून, आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलीमांजारो शिखरावर ९ ते १७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होणाऱ्या गिर्यारोहण मोहिमेसाठी त्याची निवड म्हणजे सदर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून यशने जिल्ह्याचा गौरव वाढविल्याचे प्रतिपादन वाशिम अर्बन बँकचे अध्यक्ष सुभाष राठी यांनी केले आहे. यश इंगोले याचे वडील वाशिम अर्बन बँकेच्या अमरावती शाखेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याप्रसंगी बँकेच्या संचालिका शीला राठी, हरीश राठी, कर्मचारी प्रतिनिधी तेजराव वानखेडे, शाखा प्रबंधक राजेंद्र अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते नीलेश सोमाणी, वरिष्ठ अधिकारी लक्ष्मण घोडके, सचिन देशमुख आदींची उपस्थिती होती.