वाशिम, दि. २३- राज्य शासनाच्या निर्देशानुसार शेततळे देण्याच्या जागांचे सर्वेक्षण वाशिम जिल्ह्यात करण्यात येत आहे. तथापि, तांत्रिक कारणांमुळे या योजनेसाठी प्राप्त झालेल्या ऑनलाइन अर्जांपैकी केवळ निम्म्याच जागांचे सर्वेक्षण पूर्ण होऊ शकले. या संदर्भातील अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यासाठी प्राप्त अर्जानुसार जागांची पाहणी वेगाने करण्याचा आदेश जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकार्यांनी सर्वच तालुका कृषी अधिकार्यांना दिला आहे. राज्य शासनाने ह्यमागेल त्याला शेततळेह्ण योजना मंजूर आणि महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळासाठी १0 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, ह्यमागेल त्याला शेततळेह्ण योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १ हजार ८९२ शेततळय़ांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यापेक्षा जास्त मागणी प्राप्त झाल्यास त्याप्रमाणात लक्ष्यांकामध्ये वाढ करण्यात येणार आहे. तथापि, या योजनेसाठी आजवर जिल्ह्यात १ हजार ७६९ अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात आले आहेत. अर्थात अद्यापही शेततळय़ांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याइतपतच अर्ज कृषी विभागाकडे सादर झालेले नाहीत. या योजनेत मोठय़ा प्रमाणात अर्ज प्राप्त होत असले तरी, शेततळे देण्याचा उद्देश सफल व्हावा आणि त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळावे म्हणून शासनाने शेततळे देण्याच्या जागांचे भूजल सर्वेक्षण आणि विकाससंस्था व कृषी विभागाच्यावतीने करण्याचे निर्देश २0 मे २0१६ रोजी दिले. त्यानंतर हे काम केवळ कृषी विभागामार्फतच करण्याचेही निश्चित झाले. त्यानंतर या योजनेत जिल्ह्यातील शेतकर्यांच्यावतीने प्राप्त अर्जानुसार जागांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. मागील तीन महिन्यांच्या काळामध्ये वाशिम जिल्ह्यात सहा तालुके मिळून जवळपास ९0८ जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्व जागांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरही या संदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर शेतकर्यांनी तयारी दर्शविली, तरच संबंधित जागेवर शेततळी तयार होऊ शकणार आहेत. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंंत या योजनेत जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यात १२४, कारंजा तालुक्यात १६८, मानोरा तालुक्यात १४८, मालेगाव तालुक्यात १४६, रिसोड तालुक्यात १९0, तर वाशिम तालुक्यात वाशिम १४२ असे एकूण ९0८ जागांचे सर्वेंक्षण झाले आहे. तोकडे अनुदान; शेतकरी उदासीनया योजनेंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वात मोठय़ा आकारमानाचे शेततळे ३0 मीटर रुंद, ३0 मीटर लांब आणि ३ मीटर खोल, तर सर्वात कमी १५ मीटर रुंद, १५ मीटर लांब आणि ३ मीटर खोल अशा आकारमानाचे आहे. या योजनेतील सर्वात मोठय़ा आकाराच्या तळय़ासाठी प्रत्यक्षात शेततळ्याच्या कामासाठी ३0 मीटर रुंद, ३0 मीटर लांब आणि ३ मीटर खोल, शेततळे खोदकामासाठी १ लाख २५ हजारांचा खर्च येतो. त्यामध्ये जो प्लास्टिक कागद वापरला जातो, त्यासाठी ८0 हजार आणि इतर खर्च असा ४५ हजार रुपये, असा एकूण खर्च २ लाख ५0 हजार रुपये येत असताना शासनाकडून केवळ ५0 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत असल्याने शेतकर्यांत या योजनेबाबत फारसा उत्साह नाही.
शेततळय़ांच्या लक्ष्यांकातील निम्म्या जागांचे सर्वेक्षण
By admin | Published: September 24, 2016 2:17 AM