लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (वाशिम) : रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद, दि स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड २०१८’ हा राज्यातील ५३ जणांना ७ आॅक्टोबर रोजी अक्कलकोट जि. सोलापूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यामध्ये कारंजा येथील शिक्षिका नीता तोडकर यांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकाºयांची या अवार्डसाठी निवड केली जाते. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत सदर अवार्ड देण्यात आले. ‘रानभाजी खाद्य महोत्सवातून विद्यार्थ्यांमध्ये आहार व आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे’ हा त्यांच्या नवोपक्रमाचा विषय होता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘इनोव्हेशन प्रॅक्टीसेस इन स्कूल एज्युकेशन कॉन्फरन्स’मध्ये ज्येष्ठ शात्रज्ञ तथा असर पुणेचे समन्वयक डॉ. अरविंद नातू, सोलापुर विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ.मृणालिनी फडणविस, नवोपक्रम विभागाच्या गितांजली बोरुडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्राथमिक शिक्षकांमधून जि.प.विद्यालय कामरगाव ता. कारंजा येथील शिक्षिका नीता तोडकर यांना हा अवार्ड प्रदान करण्यात आला.
‘टीचर इनोव्हेशन अवार्ड’ने कारंजाच्या निता तोडकर सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 2:27 PM