०००००
शेतकरी चेतना केंद्राचा अभाव
वाशिम : गावस्तरावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच योग्य शेती विषयक मार्गदर्शन मिळावे म्हणून शासनाकडून शेतकरी चेतना केंद्राची स्थापना केली जात आहे. कवठा येथे शेतकरी चेतना केंद्र मंजूर नसल्याने शेतकºयांची गैरसोय होणार आहे.
000
हराळ येथे तीन कोरोना रुग्ण
वाशिम : रिसोड तालुक्यातील हराळ येथे आणखी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागातर्फे नागरिकांची तपासणी केली जात आहे.
००
तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडला
वाशिम : क्रिडाप्रेमी युवकांना मैदानी खेळांसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, मालेगाव येथे तालुका क्रीडा संकुलही उभारले जावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; मात्र क्रीडा संकुलाचे काम अद्यापही अपूर्णच आहे.
0000
शाळांमधील सुविधांकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष
वाशिम : १४ व १५व्या वित्त आयोगातून विकासविषयक कामांसोबतच शिक्षण आणि आरोग्य या दोन प्रमुख घटकांवर एकूण खर्चाच्या २५ टक्के रक्कम खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र, मालेगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी निधी खर्च करण्याकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
0000
तामशी येथे तीन कोरोना रुग्ण
वाशिम : वाशिम तालुक्यातील तामशी येथे आणखी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल २७ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
००००
कारंजा येथे कोरोना चाचणी
वाशिम : कारंजा शहरात गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठेत सकाळच्या सुमारास गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले.
०००
विनामास्क आढळून आल्याने कारवाइ
वाशिम : दुचाकीवर विनामास्क आढळून येणाऱ्या ३५ जणांवर मंगळवारी शिरपूर पोलिसांनी दंडात्मक कारवाइ केली. कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाहनचालकांनी मास्क किंवा रूमालचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या.
००००
रोहयोंतर्गतची कामे उपलब्ध करा
वाशिम : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गतची राजुरा परिसरात सध्या रोजगाराची कामे उपलब्ध नाहीत. मजुरांना कामे उपलब्ध व्हावी म्हणून रोहयोंतर्गत कामे सुरू करावी अशी मागणी मजुरांनी सोमवारी केली.
00
बेलखेडा येथे जनजागृती
वाशिम : बेलखेडा ता. रिसोड येथे आणखी १२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. कोरोनाबाबत आरोग्य विभाग व ग्रामपंचायतींद्वारे जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले.