कोरोना विषाणू संसर्ग मध्यंतरी काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर शासकीय यंत्रणेसह अनेकांना दिलासा मिळाला होता., परंतु ऐन परीक्षा तोंडावर आल्या असताना कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक सुरू झाला आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाद्वारे कडक निर्बंधही लावण्यात येत असून, दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर गर्दी होता कामा नये म्हणून. संबंधित शाळांतच परीक्षा केंद्र मिळणार असल्याची चर्चा रंगत आहे. असे घडल्यास मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्र निर्माण होत. परीक्षा निरीक्षक वाढणार आहेत., परंतु माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांच्या नियमांचे काटेकोरपणे बजावणी होईल का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. स्थानिक शाळांना परीक्षा केंद्र मिळाल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याच्या प्रतिक्रियाही भर जहॉगिर परिसरात उमटत आहेत.
दहावी, बारावी परीक्षेचे केंद्र स्थानिक शाळांना भेटण्याच्या चर्चेला आले उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:18 AM