रिसोड (वाशिम) : रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीला आलेल्या पुरात एक वृद्ध वाहून गेल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. हिवरा पेन येथे नदीमध्ये एक वयोवृद्ध बुडाल्याची माहिती वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत, तसेच रिसोडचे तहसीलदार अजित शेलार यांनी श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा येथील रासेयो आपत्ति व्यवस्थापन बचाव पथकाचे समन्वयक प्रा. बापुराव डोंगरे यांना दिली.
यानंतर प्रा. डोंगरे यांनी पथकाचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या सदस्यांना सर्व सुरक्षा साहित्यांसोबत हिवरा पेन येथे सकाळीच रवाना केले. पथकाचे प्रविण गावंडे, ज्ञानेश्वर खडसे, सुमित राठोड, पुनेश राठोड, अनिकेत इंगळे, अभिषेक ठाकरे, नामदेव डाळ, विलास नवघरे, चंदन गव्हाने व गणेश शिंदे आदि सदस्य घटनास्थळी दाखल झाले असून सर्च ऑपरेशनाला सुरूवात करण्यात आली आहे.