नव्याने एकही रुग्ण नाही; एक जण कोरोनामुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:43+5:302021-09-16T04:51:43+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. रुग्णांचा आकडा हा एक अंकी असल्याने जिल्ह्याची वाटचाल ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. रुग्णांचा आकडा हा एक अंकी असल्याने जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे आहे. मंगळवारी जिल्ह्यात नव्याने एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता. सलग दुसऱ्या दिवशीदेखील बुधवार, १५ सप्टेंबरला नव्याने रुग्ण आढळून आला नाही तर एका जणाने कोरोनावर मात केल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७३५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
आठ सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नवीन रुग्ण आढळून आला नाही तर एक जणाने कोरोनावर मात केली. सध्या गृहविलगीकरणात ८ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. एकही रुग्ण दवाखान्यात भरती नाही.
0000000000000