शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही - डाॅ. विजय जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 03:34 PM2021-02-04T15:34:15+5:302021-02-04T15:34:32+5:30

Vijay Jadhav interview राज्य शासन पुरस्कार प्राप्त डाॅ. विजय जाधव यांची मुलाखत.

There is no way out without education - Dr. Vijay Jadhav | शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही - डाॅ. विजय जाधव

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही - डाॅ. विजय जाधव

Next


वाशिम : येथील राजस्थान महाविदयालयातील प्रा. डाॅ. विजय जाधव यांना त्यांच्या अस्वस्थ तांडा या कथा संग्रहास यशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कार योजने अंतर्गत शासकीय प्रथम प्रकाशन लघुकथेसाठी दिला जाणारा ग. ल. ठोकळ पुरस्कार मिळाला. जिल्हयात आधी साहित्यिक ना.च. कांबळे यांना पदमश्री तर जाधव यांच्या कथासंग्रहास राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांची घेतलेली मुलाखत

आपणास मिळालेल्या पुरस्काराबद्दल काय सांगाल ?
माझ्या "अस्वस्थ तांडा" या कथा संग्रहास यशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कार योजने अंतर्गत शासकीय प्रथम प्रकाशन लघुकथेसाठी दिला जाणारा ग. ल. ठोकळ पुरस्कार मिळाल्याने निश्चितच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.     या पुरस्कारापर्यत मला ग्राथाली प्रकाशनाने पोहचविले आहे.त्या बद्दल प्रकाशकांचे आणि महाराष्ट्र शासनाचे मी मनःपूर्वक आभारी आहे

कथा लेखनाच्या प्रवासाबद्दल काय सांगाल ?
२०१३ ची गोष्ट आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये आमच्या तांड्यावर असताना अर्धा तांडा उस कापायला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोल्हापूर भागात जात होते. आमचे भाऊ, बंद असल्याने मी त्यांना वाटी लावण्यासाठी ट्रकजवळ उभा होतो. लहानसा मुलगा ट्रक जवळ उभा राहून खूप रडत होता तर मी विचारणा केली असता कोणती दिड- दमडीची शाळा बुडते म्हणून पंधरा दिवसांपासून डोकं खातं आहे म्हणे. दोन झपके दिले तेव्हा सोबत यायला तयार झाला आहे मात्र आताही रडतचं आहे  या घटनेपासून कथा लििहणे सुरू केले.

अस्वस्थ तांडा" या पुस्तकाबद्दल काय सांगाल ?
या संग्रहातील सर्वंच कथा सत्य घटनेवर आधारित असून तांड्याच्या एकुणच अस्वस्थतेच्या वर्णन करणा-या आहेत.  "अस्वस्थ तांडा" या कथासंग्रहात तांड्याच्या समस्येबरोबर तांड्याच्या संस्कृती,प्रथा, परंपरेचे वर्णन आले आहे

तांड्यात जगणा-या लोकांना तुम्ही तुमच्या साहित्यातून कोणता संदेश द्यालं?
 तांडा आजही प्रचंड दारिद्र्यात, अंधश्रद्धेत,अज्ञानात, व्येसनाधिनतेत जगत आहे.या सर्व समस्येवर मात करण्यासाठी माझ्या तांड्यातील तमाम बांधवांनी आपल्या लेकरांच्या शिक्षणावर भर द्यावा. त्यांना अंधश्रद्धेपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करावं.  संत सेवालाल महाराजांनी, महानायक वसंतराव नाईक साहेबांनी सांगितलेल्या विज्ञानवादाचा स्विकार करून जीवन जगावे. सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या लोकशाहीचा वापर करून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही या तत्वांचा वापर करून जगावे.

Web Title: There is no way out without education - Dr. Vijay Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.