वाशिम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र तरीही जिल्ह्यात काही नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले असून चेह्ऱ्यावर मास्क न लावता फिरणाº्या व्यक्तींवर पोलिसांनी सक्त कारवाई करावी, याकरिता विशेष मोहीम राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मास्क न वापरल्याप्रकरणी एकापेक्षा जास्तवेळा दंड होणाऱ्यांवर शहरात फिरण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. त्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.कोरोना विषाणू संसगार्मुळे राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या संसार्गावर नियंत्रण आणण्यासाठी चेहº्यावर मास्क, रुमाल अथवा गमछा बांधणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे तसेच वेळोवेळी हात स्वच्छ धुणे आदी खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिकांना याबाबत वारंवार आवाहन करूनही त्यांच्याकडून याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे.त्यामुळे यापुढे चेहº्यावर मास्क न बांधता शहरात, सार्वजनिक ठिकाणी फिरणाº्या नागरिकांकडून एकरकमी ५०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच एकाच नागरिकावर एकापेक्षा जास्त वेळा दंडाची रक्कम आकारण्यात आल्यास, अशा नागरिकाला शहरामध्ये फिरण्यास मज्जाव करून त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मोडक यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
एकापेक्षा जास्त वेळा दंड झालेल्यांना आता शहरात फिरण्यास मज्जाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:30 PM