तीन रानडुकरांचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 01:03 PM2019-02-11T13:03:14+5:302019-02-11T13:03:19+5:30
मंगरुळपीर: जंगलात पाण्याचे स्त्रोत नसल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी शिवारात भटकंती करीत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत असून, पाण्यासाठी भटकत असलेल्या तीन रानडुकरांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा शिवारात सोमवार ११ फेब्रुवारी रोजी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क

वनोजा शिवारात हरीण, रानडुक्कर, निलगाय आदि वन्यप्राणी मोठ्या संख्येने तहान भागविण्यासाठी वनोजा शिवारात फिरत आहेत. अशातच सोमवारी या शिवारातील वासुदेव राऊत यांच्या शेतातील विहिरीत तीन रानडुकरे पडली असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही माहिती वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम मंगरूळपीर शाखा वनोजाचे सदस्य आदित्य इंगोले यांना दिली. त्यावरून आदित्य इंगोले आणि त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळ गाठले; परंतु तिन्ही रानडुकरांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले. सदर घटनेची माहिती कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्र अधिकारी देवानंद डोंगरे, तसेच मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे यांना देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी डाखोरे व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीमच्या सदस्यांनी तिन्ही मृत रानडुकरांना विहितीबाहेर काढले. यासाठी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम मंगरूळपीर शाखा वनोजाचे सदस्य अमर खडसे, हरिष इंगोले, शुभम हेकड, सतिष गावंडे, वैभव गावंडे, आदित्य इंगोले, प्रदिप सावळे, चेतन महल्ले, गोपाल झोंबाडे, सौरव इंगोले, अतुल इंगोले यांचे सहकार्य लाभले. वनविभागाने पचंनामा करून तिन्ही मृत रानडुकरांना रितसर दफन केले.