दोन दिवसांत जबरी चोरीच्या तीन घटना उघडकीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 05:55 PM2019-04-28T17:55:42+5:302019-04-28T17:55:56+5:30

वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव, शिरपूर येथे गेल्या दोन दिवसांत जबरी चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत.

Three robbery in two days! | दोन दिवसांत जबरी चोरीच्या तीन घटना उघडकीस!

दोन दिवसांत जबरी चोरीच्या तीन घटना उघडकीस!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव, शिरपूर येथे गेल्या दोन दिवसांत जबरी चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. यावरून चोरट्यांचे मनोबल वाढल्याची चर्चा होत आहे. पोलिस प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष पुरवून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
२६ एप्रिल रोजी रात्री घरातील मंडळी छतावर झोपण्यासाठी गेली असता, अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून दोन कपाटांमध्ये असलेले ५० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण ८८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. मालेगाव तालुक्यातील दापूरी येथील या घटनेप्रकरणी रामेश्वर हरीभाऊ कालवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध शिरपूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. 
वडप (ता.मालेगाव) येथे पार्वतीबाई मोतीराम गायकवाड (वय ६० वर्षे) ही वृद्ध महिला २७ एप्रिलच्या रात्री घराच्या अंगणात एकटीच झोपलेली असताना साधारणत: रात्री एक वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डाव साधत एकाने तोंड दाबून; तर दुसºयाने त्यांच्या गळ्यातील १ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरीने काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले.
तिसºया घटनेत शिरपूर जैन येथील विवाहित महिला किरण हरीश बोबडे ही २८ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अंगण झाडत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी तीचे केस धरून व तोंड दाबून गळ्यातील सोन्याची पोथ लंपास केली. प्रसंगावधान राखून संबंधित महिलेने पोथ तोडणाºया व्यक्तीच्या बोटाला चावा घेतला. त्यामुळे पोथ जमिनीवर पडली. तसेच अज्ञात चोरट्याच्या हातातील चाकू देखील जमिनीवर पडला. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले.

Web Title: Three robbery in two days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.