लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकºयांपर्यंत इत्यंभूत माहिती पोहचविण्याच्या दृष्टिने रिसोड तहसिल कार्यालयात १८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या कार्यशाळेतून अधिकारी-कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले.मार्गदर्शक म्हणून रिसोड तहसीलदार अजित शेलार होते. यावेळी सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांची उपस्थिती होती. कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी काय करावे, शेतकºयांचे आधार कार्ड प्रमाणित कसे करावे याबाबत शेलार यांनी मार्गदर्शन केले. आधार कार्ड प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकºयांना संबंधित बँक शाखेत तसेच आपले सरकार ई सेवा केंद्रावर सुद्धा शेतकºयांना आधार कार्ड प्रमाणीकरण करता येईल, असेही शेलार म्हणाले. दरम्यान, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चित्ररथाद्वारे जनजागृतीला सुरूवात केली आहे. १७ फेब्रुवारी रोजी रिसोड येथून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष वामनराव देशमुख यांच्या हस्ते हिरवी पताका फडकवून उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक नारायणराव सानप, व्यावसायिक प्रभाकरआप्पा जिरवणकर, भारतभाऊ कोकाटे, माजी सभापती बाळासाहेब खरात, आदर्श शेतकरी नामदेवराव पाचरणे उपस्थित होते. हा चित्ररथ बँक तथा सेवा सहकारी संस्था यांच्या कार्यक्षेत्रातील गावात फिरणार आहे.
कार्यशाळेतून कर्जमुक्ती योजनेचे प्रशिक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 6:24 PM