हाणामारीतील १२ जणांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:09+5:302021-03-13T05:16:09+5:30
महा आवास अभियान; रिठद येथे जनजागृती वाशिम : अपूर्ण घरकुलांचे बांधकाम पूर्ण करणे, घरकुलांसाठी जागा उपलब्ध करणे, अतिक्रमित ...
महा आवास अभियान; रिठद येथे जनजागृती
वाशिम : अपूर्ण घरकुलांचे बांधकाम पूर्ण करणे, घरकुलांसाठी जागा उपलब्ध करणे, अतिक्रमित जागा नियमानुकूल करणे आदी उद्देशांतून ‘महा आवास अभियान’ राबविण्यात येत आहे. रिठद परिसरात पंचायत समितीच्या चमूतर्फे जनजागृती करण्यात आली.
केनवड येथे आराेग्य तपासणी माेहीम
वाशिम : रिसोड तालुक्यातील केनवड येथे ग्रामस्थांची काेराेना चाचणी करण्यात आली. परिसरातील नंधाना येथेही खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची आरोग्य विभागातर्फे तपासणी करण्यात आली आहे.
मंगल कार्यालयांचे संचालक अडचणीत
वाशिम : मध्यंतरी कोरोना संकटातून दिलासा मिळाल्यानंतर लग्नकार्य व इतर कार्यक्रम व्हायला लागले होते; मात्र, गेल्या काही दिवसांपासून मर्यादित उपस्थितीचे बंधन लागू करण्यात आल्याने मंगरुळपीर शहरातील मंगल कार्यालयांचे संचालक अडचणीत सापडले आहेत.