तक्षशिला बुद्ध विहार येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:41 AM2021-07-29T04:41:36+5:302021-07-29T04:41:36+5:30
बुद्ध कालगणनेनुसार आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाचा काळ सुरू होत असतो. गुरुपौर्णिमेपासून तक्षशिला बुद्ध विहार येथे सुद्धा वर्षावास प्रारंभ झाला असून ...
बुद्ध कालगणनेनुसार आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाचा काळ सुरू होत असतो. गुरुपौर्णिमेपासून तक्षशिला बुद्ध विहार येथे सुद्धा वर्षावास प्रारंभ झाला असून या पवित्र काळात बुद्ध टेकडीवर विविध फळांची, फुलांची व शोभेचे वृक्ष लावण्यात आले. प्रथम भंते बुद्धकीर्ती यांच्या हस्ते पिंपळ वृक्षाचे रोपण करण्यात आले. त्यानंतर इतर वृक्ष लावण्यात आले. याप्रसंगी भंते विमलकीर्ती, सामाजिक कार्यकर्ते दत्तराव धांडे, कास्ट्राईब महासंघाचे जिल्हा सरचिटणीस विनोद राजगुरू, शिक्षक विश्वास जमधाडे, सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे युवानेते राहुल जुमडे, मुख्याध्यापक नारायण मोरे, शिक्षक सर्वश्री डी.पी .अंभोरे, विवेक वानखेडे, मंचकराव वाठोरे, संतोष मोरे, माधवराव खोडके, राधाकृष्ण कांबळे, पांडुरंग तायडे, गुलाब खा पठाण, कडूजी शिंदे, अमर खान, विठ्ठल शिंदे व इतर उपासकांची उपस्थिती होती.