सिमेंट ट्रक विहिरीत पडल्याने क्लिनरचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 04:22 PM2020-05-19T16:22:30+5:302020-05-19T16:45:50+5:30

चालकाचा जागीच मुत्यु झाल्याची घटना १८ मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

The truck fell into the well as it lost control; Death of the driver | सिमेंट ट्रक विहिरीत पडल्याने क्लिनरचा मृत्यू!

सिमेंट ट्रक विहिरीत पडल्याने क्लिनरचा मृत्यू!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कारंजा लाड : सिमेंटने भरलेला ट्रक विहिरीत पडल्याने क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर औरंगाबाद दृततगती मार्गावरील तपोवन फाट्याजवळ १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. ३८ वर्षिय नबी हसन खॉर्  रा. तिरकी बाजार जिल्हा गया (बिहार ) असे मृत्यू झालेल्या क्लिनरचे नाव आहे.
 एम .एच. ३४ बीजी ९४५१ क्रमांकाचा लक्ष्मी ट्रान्सस्पोटर््सचा सिमेंटने भरलेला ट्रक चंद्रपूरहून समृध्दी महामागार्साठी सिमेंट घेवून मालेगाव समोरील ईराळा प्लंँटवर जात असतांना मार्गातील तपोवन फाट्याजवळ विहिरीत पडला. सदर ट्रक रस्त्यातच बिघाड झाल्याने चालू बंद होत होता. त्यामुळे ट्रकचालकाने क्लिनरला ट्रकच्या बॅटरीचे वायर तपासण्यास सांगितले. वायर तपासत असतांनाच अचानक ट्रक चालू झाला व पुढे जावून एका झाडावर धडकला. यावेळी क्लिनर टँकची कॅबिन व झाड याच्यामध्ये अडकला होता. तेव्हा चालकाने आरडाओरड केल्याने जवळपासच्या शेतातील शेतकरी व मजूर घटनास्थळी धावले व क्लिनरला वाचविण्याचे त्यांनी प्रयत्न केले,  परंतु अपघातग्रस्त ट्रकमध्ये ३०  टन सिमेंट असल्याने झाड तुटले व ट्रक क्लिनरसह विहिरीत पडला. त्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. जमलेल्या शेतकºयांनी घटनेची माहिती कारंजा ग्रामीण पोलीसांना दिल्याने ठाणेदार इंगळे यांनी आपल्या सहकाºयासमवेत घटनास्थळी धाव घेतली व ट्रक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. १९  मे रोजी पहाटे ४ वाजता रेस्क्यु आॅपरेशन टिम व गा्रमीण पोलीसांना ट्रकचे चेसीज व क्लिनरचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. १९ मे रोजी मृत्यू पावलेल्या क्लिनरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शेंबाडे यांनी दिली. तर टँकर बाहेर काढण्याचे काम वृत्तलिहेस्तोवर  सुरू होते.

Web Title: The truck fell into the well as it lost control; Death of the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.