दोन कंटेनरची समोरासमोर धडक; दोन जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 04:17 PM2019-04-16T16:17:38+5:302019-04-16T16:19:17+5:30
शेलुबाजार (वाशिम) : दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने दोन गंभीर किरकोळ तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना १५ एप्रिलच्या मध्यरात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार (वाशिम) : दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने दोन गंभीर किरकोळ तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील मांडवा फाट्याजवळ १५ एप्रिलच्या मध्यरात्री २ वाजेदरम्यान घडली. अरविंद गिºहे (३२) व पंचांग गिºहे (३०) रा. झारखंड असे गंभीर जखमींची नावे आहेत.
नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरून सी.जी. ०४ एल.एफ. ५५०९ क्रमांकाचे कंटेनर तसेच एम.एच.४० बि.जी.७९७७ क्रमांकाचे कंटेनर परस्परविरोधी दिशेने जात असताना, १५ एप्रिलच्या मध्यरात्रीदरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मांडवा फाट्याजवळ दोन्ही कंटेनरची समोरासमोर जबर धडक झाली. यामध्ये सी.जी. ०४ एल.एफ. ५५०९ या क्रमांकाचे कंटेनर चालक अरविंद गिºहे व क्लिनर पंचांग गिºहे रा. झारखंड हे गंभीर जखमी झाले. तर एम.एच.४० बी.जी.७९७७ या क्रमांकाच्या कंटेनरचा चालक किरकोळ जखमी झाला.
जखमींना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी गिºहे बंधूंपैकी एकाचे दोन्ही पाय निकामी झाल्याने पुढील उपचारार्थ त्यांना अमरावती येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. परंतु शेलूबाजार चौकीचे सर्व कर्मचारी निवडणूक ड्युटीवर असल्याने जखमींना तात्काळ मदत मिळाली नाही. जवळपास ४५ मिनिटे जखमी हे रस्त्यावर मदतीची याचना करीत होते. शेवटी १०८ क्रमांकावर संपर्क साधून जखमींसाठी रुग्णवाहीका उपलब्ध करण्यात आली.