आसेगाव परिसरात दोन तास मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:28 AM2021-07-16T04:28:11+5:302021-07-16T04:28:11+5:30

आसेगाव परिसरात या आठवड्यात सुरुवातीपासून पाऊस पडत आहे. अनेक दिवस खंड दिलेल्या पावसाचे पुनरागमन झाल्याने पिकांना आधार मिळाला आणि ...

Two hours torrential rain in Asegaon area | आसेगाव परिसरात दोन तास मुसळधार

आसेगाव परिसरात दोन तास मुसळधार

Next

आसेगाव परिसरात या आठवड्यात सुरुवातीपासून पाऊस पडत आहे. अनेक दिवस खंड दिलेल्या पावसाचे पुनरागमन झाल्याने पिकांना आधार मिळाला आणि शेतकरी उत्साहित झाले ; परंतु बुधवारी रात्री अचानक पावसाने रुद्र रुप धारण केले. जवळपास दोन तास कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करून टाकले. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आणि अनेकांच्या शेत जमिनी खरडल्या. शेतकऱ्यांनी ३०० रुपये प्रति ट्रॉली दराने शेतात धरणातील गाळ टाकून जमिनीचा कस वाढविला होता. आता या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आसेगाव, चिंचोली, नांदगाव, पिंपळगाव आदी गावातील शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला. नांदगाव येथील कल्पना गणेश ठाकरे, अनसिंगचे इरफान खान, आसेगावचे मोबीन खान इस्माइल खान, मोहम्मद फैयाज अब्दुल रऊफ, मुख्तार खान नुरुल्लाह खान, जमिरुल्लाह खान मनसब खान, अब्दुल अलिम अब्दुल मजिद, अब्दुल जमील अब्दुल सलाम, इरफान अब्दुल नसिर, मकसूद खान मनसूर खान, शाहनूर खान नूर खान, सलमा बी शेख उस्मान, शेख रेहान शेख उस्मान, शेख सलमान शेख उस्मान आदी शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, मूग, उडीद पिकाचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून, त्यांनी नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.

---------------

आता शेतासाठी नव्याने खर्च

आसेगाव परिसरात बुधवारी रात्री आलेल्या पावसामुळे नदी नाल्या काठी शेती असलेल्या आसेगाव, चिंचोली, नांदगाव, पिंपळगावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता या शेतात दुबार पेरणी करण्यासाठी त्यांना पुन्हा शेतात धरणाचा गाळ टाकून जमीन पेरणी योग्य करण्यासाठी खर्च करावा लागणार असून, यासाठी पैसा आणावा कोठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होत आहे.

Web Title: Two hours torrential rain in Asegaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.