केंद्रीय मंत्र्यांनी घेतला आॅक्सिजनसंदर्भात आढावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:45 AM2021-04-28T04:45:03+5:302021-04-28T04:45:03+5:30
कोरोनाच्या दुसºया लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. एकिकडे रुग्णसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे आवश्यक त्या वैद्यकीय सेवा त्या तुलनेत ...
कोरोनाच्या दुसºया लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. एकिकडे रुग्णसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे आवश्यक त्या वैद्यकीय सेवा त्या तुलनेत कमी पडत असल्याचे दिसून येते. विशेषत: आॅक्सिजनसंदर्भात नेमकी मागणी, उपलब्धता, पुरवठा यासंदर्भात विदर्भातील जिल्हानिहाय माहिती घेण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी विदर्भातील सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकाºयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. सध्याची आॅक्सिजनची गरज, उपलब्धता व पुरवठा याअनुषंगाने माहिती घेण्यात आली. आॅक्सिजन निर्मिती प्लांट याशिवााय अन्य मार्गाने आॅक्सिजनची उपलब्धता कशी करता येईल याबाबत ना. गडकरी यांनी संवाद साधला. याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शन, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता याचाही आढावा घेतला. वाशिम जिल्ह्यातील आॅक्सिजन उपलब्धता तसेच एकूणच कोरोनाविषयक स्थितीची माहिती जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिली.