कोरोनाच्या दुसºया लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. एकिकडे रुग्णसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे आवश्यक त्या वैद्यकीय सेवा त्या तुलनेत कमी पडत असल्याचे दिसून येते. विशेषत: आॅक्सिजनसंदर्भात नेमकी मागणी, उपलब्धता, पुरवठा यासंदर्भात विदर्भातील जिल्हानिहाय माहिती घेण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी विदर्भातील सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकाºयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. सध्याची आॅक्सिजनची गरज, उपलब्धता व पुरवठा याअनुषंगाने माहिती घेण्यात आली. आॅक्सिजन निर्मिती प्लांट याशिवााय अन्य मार्गाने आॅक्सिजनची उपलब्धता कशी करता येईल याबाबत ना. गडकरी यांनी संवाद साधला. याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शन, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता याचाही आढावा घेतला. वाशिम जिल्ह्यातील आॅक्सिजन उपलब्धता तसेच एकूणच कोरोनाविषयक स्थितीची माहिती जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिली.
केंद्रीय मंत्र्यांनी घेतला आॅक्सिजनसंदर्भात आढावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:45 AM