प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:04+5:302021-03-13T05:16:04+5:30
धनज बु. येथे नववर्षात १५ फेब्रुवारीला पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर धनज बु.सह परिसरातील गावात झपाट्याने कोरोना बाधितांची ...
धनज बु. येथे नववर्षात १५ फेब्रुवारीला पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर धनज बु.सह परिसरातील गावात झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत गेली. गेल्या महिनाभराच्या काळात धनज बु. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३० गावात १३० कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. दर दिवशी कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून बाधित व्यक्तींना गृह विलगीकरणासाठी परवानगी देण्यात आली, तसेच बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचीही तपासणी वेगात सुरू करण्यात आली असून, परिसरात कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी ९ मार्चपासून धनज बु. आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली. गत दोन दिवसांत या मोहिमेंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षे वयावरील दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती मिळून ७३ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.