येथे नववर्षाचे स्वागतच भीषण पाणी टंचाईने होते. गावातील लाखोंची नळयोजना ही भीषण पाणी टंचाईला अभय देऊ शकली नाही. तर गावातील मुख्य स्त्यावर मात्र घाण पाण्याचे गटार साचलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे गावामध्ये आदिवासीबहुल समाजाची वस्ती असून सुविधांची दाणादाण उडाली आहे.
कु-हा गावाची लोकसंख्या जवळपास तेराशेच्या आसपास आहे. येथील ग्रामपंचायतीतर्फे झालेल्या विकास कामासंदर्भात पंचायत समितीकडे लेखी तक्रारी दाखल होत अनेक कामांची चौकशीसुध्दा झालेली आहे. मे महिन्याचा शेवट असताना, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. थोरांपासून वृध्दापर्यंत फक्त पाणी भरण्यासाठी दिवसांचा उपयोग करावा लागत आहे. तरीसुध्दा गावामध्ये पाण्याच्या टँकरचा पत्ता नाही. गावातील तीव्र पाणी टंचाई असताना, गावातील मुख्य स्त्यावर मात्र घाण पाण्याचे गटार साचलेले दिसत आहे. चुकीच्या पध्दतीच्या रस्त्यांमुळे रस्त्यावर गटार साचत असल्याचे ग्रामस्थ बाेलताहेत. गाव विकासासह गावातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा करण्याची एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
...गावातील नळयोजनेद्वारे आठ दिवसाला एकदा पाणी सोडले जाते. कारण विहिरीला मुबलक पाणी नाही.
सुजाता सुदाम तायडे, सरपंच, कुऱ्हा
गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे. गावातील विकास कामाचा बट्ट्याबोळ होत असल्याच्या पंचायत समितीकडे लेखी तक्रारी दाखल केल्याने काही बोगस कामे बंद झाली आहेत. गावातील रस्त्यावर घाण पाण्याचे गटार साचलेले आहे. यामधून साथरोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रकाश माणिकराव नागरे, ग्रामस्थ, कुऱ्हा