VIDEO : शिरपुरात साकारतेय १५० फूट उंच मंदिरासह ‘पारसबाग’
By admin | Published: September 20, 2016 02:51 PM2016-09-20T14:51:30+5:302016-09-20T15:03:14+5:30
जैनाची काशी संबोधल्या जाणा-या श्री क्षेत्र शिरपूर जैन येथे ‘पारसबाग’ निर्माण कार्यास प्रारंभ झाला आहे.
Next
- शंकर वाघ, ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन ( वाशिम), दि. २० - जैनाची काशी संबोधल्या जाणा-या श्री क्षेत्र शिरपूर जैन येथे ‘पारसबाग’ निर्माण कार्यास प्रारंभ झाला आहे. विविध प्रदेशातील ६०० च्यावर कामगार या पारसबागेला आकार देण्याचे कार्य रात्रंदिवस करतांना दिसून येत आहेत. या बागेतील १५० चौरस फूट व उंचीलाही १५० फूट चतुरमूख मंदिराच्या कामास जैनमुनी विमलहंस विजयजी महाराज व परमहंसजी महाराज यांच्या प्रेरणेने प्रारंभ झाला आहे.
शिरपूर जैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानच्यावतीने होत असलेल्या विकास कामांमुळे पर्यटकांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. शिरपुरात ‘पारसबाग’ स्थापन होत असल्याची माहिती अनेकांना मिळाल्याने पर्यटक भेट देत आहेत. येथे स्थापन होत असलेल्या पारसबाग कामाकरीता ओरीसा, बिहारसह महाराष्टÑातील ६०० च्यावर कामगार काम करतांना दिसून येत आहेत. कामे करतांना कोणतीही अडचण निर्माण होवू नये म्हणून संस्थानच्यावतिने स्टोन कटर मशिन, क्रेन यासह लागणाºया विविध मशनरीज विकत घेतल्या आहेत. येथे उभारण्यात येत असलेल्या या भव्य मंदिरामध्ये जैन तिर्थकारांच्या २४ मुर्त्या लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मंदिराच्या गाभाºयात आर्ट गॅलरीची सुध्दा सुविधा निर्माण करण्यात आली असून त्यामध्ये थ्रीडी इफेक्ट राहणार आहे. मंदिर परिसरातच बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा विहिरीवर पार्श्वनाथ भगवानाचे जल मंदिर निर्माण करण्याच्या कामासही प्रारंभ करण्यात आला आहे. सदर काम लवकर पूर्ण करुन भाविकांना याचा लाभ मिळावा यासाठी संस्थान प्रयत्नशिल आहे.