वाशिमच्या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने मेळघाटात विविध साहित्याचे वाटप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 02:45 PM2018-10-09T14:45:49+5:302018-10-09T14:46:06+5:30
वाशिम - मेळघाटातील अतिदुर्गम रायपुर, राहु व बोराठा या आदिवासीबहुल गावातील नागरिकांना कपडे, ब्लँकेट तसेच अन्य वस्तू व साहित्याचे वाटप वाशिम येथील स्व. डॉ केशवराव जिरोणकर स्मृती संस्था व उष:काल कलानिकेतन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व ८ आॅक्टोबरला करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

मेळघाटातील अतिदुर्गम भागात असल्याने येथील आदिवासी बांधवांना जीवनोपयोगी साहित्याची कमतरता भासते. गरजूंना कपडे, ब्लँकेटसह विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत. याप्रमाणेच वाशिम येथील स्व. डॉ. केशवराव जिरोणकर स्मृती संस्था व उष:काल कलानिकेतन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रायपुर, राहु व बोराठा या आदिवासीबहुल गावातील ११०० जणांना कपडे, ब्लँकेट, महिलांसाठी साडया व काही गृहसाहित्याचे वितरण करण्यात आले. रायपुर व राहु या गावात वीजपुरवठा नसल्याने २५ गुणवंत विद्यार्थ्यांना सौर दिव्याचे वितरण करण्यात आले. यासोबतच सर्व विद्यार्थ्यांनावह्या, पेन व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वाशिमचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आरोग्य विषयक माहिती देत पोषण आहाराबाबत मार्गदर्शन केले.