लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउन, संचारबंदीच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये तसेच कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ म्हणून खते, बियाणे शेतकºयांच्या बांधावर पोहचून देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला. या उपक्रमांतर्गत १८ मे पर्यंत जिल्ह्यातील एकूण १५ हजार ५४ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर खते, बियाणे, कीटकनाशके व इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकºयांची लुबाडणूक होऊ नये, शिवाय शेतकºयांची गरज लक्षात घेता थेट बांधावर बी - बियाणे, खते, कीटकनाशके व शेतीकरिता लागणारे आवश्यक साहित्य कृषी विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होऊन शेतकº्यांचा कृषी सेवा केंद्रावर होणाº्या गर्दीचा प्रश्न मिटणार आहे. या उपक्रमांतर्गत खते, बियाणे बांधावर मिळविण्यासाठी शेतकºयांना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. १८ मे पर्यंत जिल्ह्यातील ५९४ गावांतील १५ हजार ५४ शेतकºयांनी खते, बियाण्यांसाठी आॅनलाईन नोंदणी केली, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी दिली.
वाशिम : खतासाठी १५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:21 AM