वाशिम : ५० वर्षाच्या नराधमाने केला चिमुकलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:07 PM2018-01-13T14:07:26+5:302018-01-13T14:09:12+5:30
वाशिम: इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकलीवर ५० वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना १२ जानेवारीला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकलीवर ५० वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना १२ जानेवारीला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी वाशिम शहर पोलीसांनी नंदू वामन भिंगारदिवे याचेविरूध्द भादंवी कलम ३७६, बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला.
वाशिम शहरातील नालंदा नगर परिसरात १३ वर्षीय पिडीत मुलगी व तिचे कुटूंब वास्तव्यास आहेत. पिडीत मुलगी दुपारी ३:३० वाजता घराच्या बाहेर खेळण्यासाठी गेली होती. तिच्या आईने ५:३० वाजेपर्यंत आपल्या मुलीची वाट बघितली. परंतू ती घरी आली नसल्याने मुलीचा शोध घेण्यासाठी आईने परिसरात शोध घेतला असता दिसून आली नाही. काही वेळानंतर शेजारी राहल असलेला नंदु भिंगारदिवे याचे घराच्या वरच्या मजल्यावरून मुलगी खाली उतरत असताना दिसुन आली. मुलीची आईसोबत भेट झाल्यानंतर तिच्या चेहºयावर भितियुक्त भाव असल्याने आईने तिला आस्थेने विचारणा केली असता मुलीने आपल्यावर झालेला अत्याचार कथन केला.
पिडीत मुलीचे आईने लगेच वाशिम शहर पोलीस स्टेशन गाठून पोलीस अधिकाºयांना मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
पिडीत मुलीच्या आईने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविली. या फिर्यादीहून पोलीसांनी नंदू वामन भिंगारदिवे याचेविरूध्द भादंवी कलम ३७६, बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अस्मिता मनोहर करीत आहेत.