परिवहन महामंडळाच्या गुणतालिकेत राज्यात वाशिम आगार व्दितीय ; सातारा जिल्ह्यातील पलूस प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:06 PM2018-02-09T13:06:52+5:302018-02-09T13:13:23+5:30
वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्यावतीने विविध निकषांचे पालन करून एसटीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांच्या गुणतालिकेत वाशिम येथील आगाराने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
- नंदकिशोर नारे
वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्यावतीने विविध निकषांचे पालन करून एसटीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांच्या गुणतालिकेत वाशिम येथील आगाराने व्दितीय क्रमांक पटकावला आहे. या गुणतालिकेत सातारा जिल्ह्यातील पलूस आगार प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती वाशिमचे सहायक कार्यशाळा अधीक्षक रवी अ. मोरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिली. विशेष म्हणजे वाशिम आगाराने ९०.१२ लाख रुपयांची तूट भरुन काढली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून गुणतालिकेत अधिक उत्पन्न व बचतीमध्ये याहीवेळी वाशिम आगार कायम असल्याचे सांख्यिकी विभागाने केलेल्या क्रमवारीवरुन दिसून येत आहे. एस.टी. महामंडळाच्यावतिने २१ निकषावरुन क्रम दिल्या जातो. यामध्ये प्रमुख निकषामध्ये इंधनावर केलेला खर्च, उत्पन्न आणणे, गाडयांमधील डिझेल बचत, गाडयांचा चांगला वापर केल्याने स्पेअर पार्ट कमी लावणे, अपघात कमी, टायर कमी, जास्तीत जास्त किलोमिटर कमीत कमी गाडया व माणसांमध्ये करण्याचा समावेश आहे. डिसेंबर २०१७ च्या अंती उपरोक्त निकष पूर्ण करणाºया आगारांची गुणतालिका एसटीच्यावतीने नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वाशिम आगाराला १२७ गुण मिळाले असून, ही कामगिरी राज्यात व्दितीय क्रमांकाची ठरली आहे. गतवेळी वाशिम आगाराने १२३ गुण प्राप्त केले होते. यंदा या गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असलेल्या पलूस आगाराला १३४ गुण आहेत. या गुणतालिकेत राज्यस्तरावर आपला क्रमांक लागावा यासाठी आगार व्यवस्थापक विनोद म. इलमे, सहायक वाहतूक अधिक्षक पी.डी. डायलकर, सहायक कार्यशाळा अधिक्षक रवी मोरे यांच्यासह आगारातील सर्व चालक, वाहक, यांत्रिक, पर्यवेक्षक व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून गुणतालिकेत अधिक उत्पन्न व बचतीमध्ये वाशिम आगार व्दितीय असल्याचे सांख्यिकी विभागाकडून कळविण्यात आले आहे. तसे प्रमाणपत्र सुध्दा आगाराला प्राप्त झाले आहे. हे सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या मेहनतीमुळे शक्य झाले.
- रवी मोरे
सहायक कार्यशाळा अधीक्षक
वाशिम एस.टी. आगार