वाशिम जिल्ह्यात सरासरी २९ मीमि पाऊस; पिकांना संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 12:12 PM2021-07-12T12:12:03+5:302021-07-12T12:12:13+5:30
Washim News : पीक नुकसानाच्या धक्क्यातून सावरत यंदा शेतकºयांनी खरिप हंगामात पेरणी आटोपली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २९ मीमि पाऊस झाला असून, यामुळे खरिप हंगामातील पिकांना संजीवणी मिळाली आहे. दरम्यान, शेतकºयांना दमदार पावसाची प्रतिक्षा अजून कायम असल्याचे दिसून येते.
गत वर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानाच्या धक्क्यातून सावरत यंदा शेतकºयांनी खरिप हंगामात पेरणी आटोपली आहे. पेरणी आटोपल्यानंतर अधूनमधून पाऊस झाला. मात्र, गत २० दिवसांपासून दमदार पाऊस नसल्याने खरिपाची पिके संकटात सापडली. ७ जुलैच्या रात्रीदरम्यान थोडाफार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. १० जुलैच्या रात्रीदरम्यान जिल्ह्यात सरासरी २९ मीमि पाऊस झाल्याने पिकांना संजीवणी मिळाली. सर्वाधिक पाऊस मालेगाव तालुक्यात ५५.४० मीमि झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ९८ टक्के पेरणी आटोपली आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली असून त्याखालोखाल तूर, कपाशी, मूग व उडदाचा पेरा आहे. दमदार पाऊस नसल्याने सिंचन प्रकल्प, नदीनाले अजूनही तहानलेलेच आहेत. पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.