वाशिम जिल्ह्यात दुर्गा विसर्जन शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 01:21 PM2020-10-27T13:21:49+5:302020-10-27T13:22:08+5:30

Washim News, Navratri नवरात्रोत्सवाची सांगता २६ ऑक्टोबरदरम्यान नवदुर्गा विसर्जनाने करण्यात आली.

Washim : Durga immersion in peace | वाशिम जिल्ह्यात दुर्गा विसर्जन शांततेत

वाशिम जिल्ह्यात दुर्गा विसर्जन शांततेत

googlenewsNext

वाशिम : ‘उदे ग अंबे उदे..’चा जयघोष करीत जिल्ह्यात १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ झालेल्या नवरात्रोत्सवाची सांगता २६ ऑक्टोबरदरम्यान नवदुर्गा विसर्जनाने करण्यात आली. यंदा कोरोनामुळे नवदुर्गा विसर्जन हे मिरवणुकीविना पार पाडले. कोरोनामुळे अनेक मंडळांनी सार्वजनिकरित्या नवदुर्गेची स्थापन करणे टाळले. घरोघरी नवदुर्गेची स्थापना करण्यात आली. यंदा जवळपास २३० नवदुर्गा मंडळातर्फेे स्थापना करण्यात आली. नऊ दिवसाच्या मुक्कामानंतर जिल्ह्यात २६ ऑक्टोबर रोजी नवदुर्गांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीवरही बंदी असल्याने भाविकांनी साध्या पद्धतीने दुर्गा विसर्जन केले. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Washim : Durga immersion in peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.