वाशिम : वारा जहाँगिर सिंचन प्रकल्पातील पाण्यासाठी परिसरातील शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 05:07 PM2017-12-07T17:07:20+5:302017-12-07T17:11:03+5:30
देपूळ : शंभर टक्के सिंचनाच्या हेतुने उभारण्यात आलेल्या वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पावरील उपश्यावरील बंदी उठवून ५० टक्के पाणी जलसिचंनासाठी वापरण्यासची परवाणगी देवून रब्बी पिकाला जीवनदान द्या नाहीतर हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून गुरुवारी केली.
देपूळ : शंभर टक्के सिंचनाच्या हेतुने उभारण्यात आलेल्या वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पावरील उपश्यावरील बंदी उठवून ५० टक्के पाणी जलसिचंनासाठी वापरण्यासची परवाणगी देवून रब्बी पिकाला जीवनदान द्या नाहीतर हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून गुरुवारी केली. तसेच रब्बी पेरणीनंतर उपश्यावर बंदी आणल्याने शेतकºयांचे मोठे प्रमाणात नुकसानाची संभावना सुध्दा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या पदमा मोतीराम सोनोने, राजेंद्र सारंगधर गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली देपूळ परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून आपबिती कथन केली व आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. वारा जहाँगीर, देपूळ , उमरा शमशोद्दीन, उमरा कापसे, देगाव , काजळंबा , बोरी ही गावे आधीच दुष्काळग्रस्त आहे. या भागता शेतकरी आत्महत्यांचेही प्रमाण वाढलेले असल्याने शेतकºयांच्या आर्थिक बळकटीकरणास्तव १७९० हेक्टर सिंचन प्रकल्प वारा येथे उभारण्यात आला होता. या प्रकल्पावर पिण्याच्या पाण्याची मागणी नंसताना केवळ मुख्यमंत्र्याच्या आदेशान्वये उपसा सिंचनावर बंदी घालण्यात आली . या बंदीमुळे शेतकºयांचे मोठया प्रमाणात नुकसानाची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.
ही बंदी घालण्यासंदर्भात जर पुर्व कल्पना दिली असती , तर या परिसरात रब्बी पिकाची पेरणी झाली नसती. रब्बी पिक अर्ध्यावर असताना पााणी उपसावर बंदी आणल्याने शेतकºयांची पिके सुकू लागल्याने ही पिके धोक्यात आली आहे . सोसाबीन पिकले नाही, तुरीचे पिक वांझ झाल, े कपासी बोंड अळीने धोक्यात आली. त्यामुळे कर्ज फेडणे तर सोडा आमचे जगने कठीण होवून बसले असल्याच्या प्रतिक्रीया शेतकरी व्यक्त करीत आहे.
जिल्हयातील अनेक प्रकल्पातील सिंचन उपश्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु शेतकºयांनी ज्या प्रकल्पाच्या आधारावर पेरणी केली त्यांनी आता काय करावे असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत. पिकांना पाणी न मिळाल्यास शेकडो हेक्टरवरील पेरणी पूर्णपणे वाया जाणार असल्याने याची नुकसान भरपाई प्रशासनाने देण्याचीमागणी शेतकरी करीत आहेत.
५० टक्के जलसाठा द्या
प्रकल्पामध्ये असलेल्या जल साठयामधून ५० टक्के जलसाठा सिंचनासाठी वापरण्यास परवानगी दया अन्यथा हेक्टरी ५० हजार रुपये अनूदान दया अशी मागणी पदमा मोतीराम सोनोने , राजेंद्र गंगावणे, शंकर गंगावणे, गजानन गंगावणे यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून शेतकºयांच्यावतीने केली आहे.
आमच्या मागण्या गांभिर्य पूर्वक विचार न झाल्यास व पिक धोक्यात येवून उपासमारीने आमचे जिवन धोक्यात आल्यास त्याला शासन जबाबदार राहील असे वारा, देपूळ ,देगाव, काजळंबा, बोरी, उमरा शम , उमरा कापसे येथील शेतकरी बोलत आहे.
यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र पाणी टंचाई आहे यात दूमत नाही. पिण्याकरीताही पाणी आवश्यक आहे परंतु शेतात पेरलेले पिकांनाही पाण्याची आवश्यकता पाहता पिके वाचविण्यापुरते तरी पाणी प्रशासनाने घेवू देण्यास हरकत नसावी. असे न झाल्यास शेतकºयांनी व्याजाने, उसनवारीने पैसे घेवून घेतलेले पीक पूर्णपणे नष्ट होईल. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
- पदमा मोतीराम सोनोने, सामाजिक कार्यकर्त्या, देपूळ