वाशिम: स्थानिक एमएसएसई प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या (नारायणाज किड्ज) विद्यार्थ्यांनी जी.के. आॅलिम्पियाड परिक्षेत यंदाही घवघवीत यश मिळविले. या शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी विभागीय, तर दोन विद्यार्थ्यांनी शालेयस्तरावर सुवर्णपदक पटकावून शाळेचा लौकिक कायम ठेवला आहे. याबद्दल शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला.
या आॅलिम्पियाड परिक्षेमध्ये एमएसएसई प्रायमरी इंग्लिश स्कुलचे एकूण ३ विद्यार्थी विभागीय स्तरावर सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. त्यामध्ये रोहन शेळके, दुर्गेश शेळके, संस्कृती पवार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय शालेय स्तरावर सोहन शर्मा व प्रणली कवडे हे सुवर्ण पदकांचे मानकरी ठरले, तसेच विद्यार्थी गटातून अभिजित कडक या विद्यार्थ्याला जी.के. या विषयात रौप्य पदकावर समाधान मानवे लागले, तर वरुण धुमकेकर कांस्यपदकाचा मानकरी ठरला. हे सर्व विद्यार्थी वर्ग २ ते ७ वी पर्यंतचे असून इतक्या कमी वयात त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे संचालक अनिल धुमकेकर, अतुल धुमकेकर व प्राचार्या शिवकन्या जल्लेवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षकवृंद सारिका धुमकेकर, स्रेहा कांघे, जयश्री पाचपोर, रेणूका जोशी, प्रशांत शेळके, शिवाजी गोटे, अंकिता शेवलकर, योगेश ढेकणे, शंकर गोअे, गणेश धामणे, उमेश चव्हाण, सिमा आरवाडे, अनंत मराठे, उज्वला इंगळे, मंजुषा देशपांडे, शिवाजी गोटे, राधा थेरले, राणी चौधरी, विभा अनसिंगकर यांचे मार्गदर्शन लाभले. सत्कार कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सोनू ताजणे, सारीका शेळके, बंडू इंगोले, अंभोरे, आरु यांनी परिश्रम घेतले.