वाशिम : चार लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 10:20 AM2021-05-08T10:20:51+5:302021-05-08T10:21:08+5:30

Washim News : जिल्ह्यासाठी ६१ हजार मे.टन खतसाठा मंजूर असून त्यापैकी ३५ हजार मे.टन खत उपलब्ध झाले आहे.

Washim: Kharif sowing planned on four lakh hectares! | वाशिम : चार लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन!

वाशिम : चार लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असून, यंदा जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. कोरोनाकाळात कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर बांधापर्यंत खते, बियाणे पोहचविण्यात येणार आहेत. दरम्यान जिल्ह्यासाठी ६१ हजार मे.टन खतसाठा मंजूर असून त्यापैकी ३५ हजार मे.टन खत उपलब्ध झाले आहे.
गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागल्याचे दिसून येते. यंदाही खरीप हंगामावर कोरोनाचे सावट असून, शेतकरऱ्यांची गैररसोय होऊ नये, म्हणून कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन असून, सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. 
खतांसंदर्भात शेतकरऱ्यांची गैरसोय होऊ नये, तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून ६१ हजार ८०० मेट्रिक टन खताची मागणी केली असून ३४ हजार ८०६ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. यावर्षी ३ लाख हेक्‍टरवर सोयाबीन पेरणीचा अंदाज असून, बियाण्याची टंचाई भासू नये म्हणून ४०० हेक्‍टरवर रब्बी व उन्हाळी हंगामात पेरणी करून अतिरिक्त ३ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची उपलब्धता करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी सांगितले.
यंदाच्या खरीप हंगामात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन आहे. जिल्ह्याची गरज लक्षात घेता मुबलक खताची मागणी नोंदविली असून, आतापर्यंत ३४ हजार ८०६ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. शेतकºयांची गैरसोय होऊ नये म्हणून बांधावर खत, बियाणे पुरविण्यात येणार असून, जिल्ह्यात सात भरारी पथकांचे गठणही करण्यात आले.
- विकास बंडगर
कृषी विकास अधिकारी, वाशिम

Web Title: Washim: Kharif sowing planned on four lakh hectares!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.