लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : पश्चिमेला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून पुर्वेला असलेल्या ओडिसा राज्यातील कोणार्कपर्यंत स्वच्छ भारत-सुंदर भारत, एकतामध्येच अखंडता, असे महत्वपूर्ण संदेश देत डॉ. रामचंद्र रमेश चव्हाण यांनी सायकल यात्रा आरंभिली आहे. दरम्यान, या प्रवासादरम्यान मालेगाव येथे १२ जानेवारीला त्यांचे येथे उत्स्फूर्त स्वागत झाले.व्यवसायाने डॉक्टर असलेले ३९ वर्षीय डॉ. चव्हाण यांनी २२५० किलोमीटरची सायकल यात्रा काढली असून त्याची सुरूवात त्यांनी ५ जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून केली. १२ जानेवारीला ते मालेगावला पोहोचले, येथील चरखा यांच्याकडे त्यांचा मुक्काम असून १३ जानेवारला ते कारंजा-वर्धामार्गे पुढच्या प्रवासाला सुरूवात करतील. २२ दिवसांच्या सायकल यात्रेदरम्यान ते वाटेत लागणाºया शाळांमध्ये थांबून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा आणि जातीभेद विसरून भारतीय म्हणून एकत्र या, असा संदेश देत आहेत. दरम्यान, मालेगाव येथील नागरदास रोडस्थिती जलकुंभाजवळ झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात डॉ. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपंचायतचे आरोग्य सभापती गजानन सारस्कर, पराग पिंपरकर, आतिश बोकन, संतोष खवले, किशोर शिंदे, प्रमोद हरने, राहुल सानप, मोहन वानखेडे, अमोल निमकर, पिंटू बाविस्कर, महादेव नागमोडे, अभिषेक चरखा, भुतडा, स्वप्निल घोटेकर, विनोद घुगे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
वाशिम : एकता व पर्यावरणाच्या संदेशासाठी मालवण-कोणार्क सायकल यात्रा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 3:21 PM
मालेगाव (वाशिम) : पश्चिमेला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून पुर्वेला असलेल्या ओडिसा राज्यातील कोणार्कपर्यंत स्वच्छ भारत-सुंदर भारत, एकतामध्येच अखंडता, असे महत्वपूर्ण संदेश देत डॉ. रामचंद्र रमेश चव्हाण यांनी सायकल यात्रा आरंभिली आहे. दरम्यान, या प्रवासादरम्यान मालेगाव येथे १२ जानेवारीला त्यांचे येथे उत्स्फूर्त स्वागत झाले.
ठळक मुद्देडॉ. रामचंद्र चव्हाण यांचा उपक्रममालेगावात आगमनानिमित्त झाले स्वागत