वाशिमच्या  एस.टी. कर्मचाऱ्यांनी केली उच्चधिकार समितीच्या अहवालाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 06:23 PM2018-01-25T18:23:29+5:302018-01-25T18:25:28+5:30

Washim S. T. Staff burn the report of the High Court Committee | वाशिमच्या  एस.टी. कर्मचाऱ्यांनी केली उच्चधिकार समितीच्या अहवालाची होळी

वाशिमच्या  एस.टी. कर्मचाऱ्यांनी केली उच्चधिकार समितीच्या अहवालाची होळी

Next
ठळक मुद्देएस.टी. कर्मचाऱ्यांचा पगार वाढीकरीता न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने उच्चाधिकार समिती गठीत केली होती.या समितीने सादर केलेल्या अहवालात तटपुंजी पगारवाढ सादर केली. वाशिम आगारातील एस.टी.  कर्मचाऱ्यांनी संघटना वाद बाजुला सारुन बसस्थानकासमोर २५ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान सदर अहवालाची होळी केली. 

वाशिम : एस.टी. कर्मचाऱ्यांचा पगार वाढीकरीता न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने उच्चाधिकार समिती गठीत केली होती.या समितीने सादर केलेल्या अहवालात तटपुंजी पगारवाढ सादर केल्यामुळे वाशिम आगारातील एस.टी.  कर्मचाऱ्यांनी संघटना वाद बाजुला सारुन बसस्थानकासमोर २५ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान सदर अहवालाची होळी केली. 

संपूर्ण भारतात म.रा. परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांची पगार इतर राज्याच्या परिवहन महामंडळातील कर्मचाºयांच्या तुलनेत अतिशय कमी पगार आहे. त्यामुळे रा.प.म. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आम्हाला दर चार वर्षांनी होणारा करार नको तर इतरांप्रमाणे आम्हाला सुध्दा सेवा जेष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग लागू करुन इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार द्यावा अशी मागणी केली. परंतु प्रशासन व महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री यांनी वेळोवळी निवेदनाव्दारे विनंती केली. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने  संप पुकारले होते. यावेळी राज्य शासनाने एक उच्चधिकार समिती गठित करुन त्यांनी केलेला अहवाल न्यायालयात सादर करावयाचा होता. या अहवालात तटपुंजी वाढ व कर्मचाºयांचा पगार कमी करणारा असून यामध्ये कर्मचाºयांचे नुकसान आहे. याकरिता सर्व कर्मचारी संघटना एकत्र येवून त्यांनी या अहवालाची होळी केली. यावेळी आगारातील कर्मचाऱ्यांचीही उपस्थितीहोती.

Web Title: Washim S. T. Staff burn the report of the High Court Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.