वाशिम : २२ हजार शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:01 PM2020-06-01T17:01:33+5:302020-06-01T17:01:59+5:30
कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ म्हणून खते, बियाणे शेतकºयांच्या बांधावर पोहचून देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउन, संचारबंदीच्या काळात शेतकºयांची गैरसोय होऊ नये तसेच कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ म्हणून खते, बियाणे शेतकºयांच्या बांधावर पोहचून देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला. या उपक्रमांतर्गत ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील एकूण २१ हजार ९१८ शेतकºयांच्या बांधावर ९७५४.४ क्विंटल बियाणे पोहचविण्यात आले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर खते, बियाणे, कीटकनाशके व इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकºयांची लुबाडणूक होऊ नये, शिवाय शेतकºयांची गरज लक्षात घेता थेट बांधावर बी - बियाणे, खते, कीटकनाशके व शेतीकरिता लागणारे आवश्यक साहित्य कृषी विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होऊन शेतकº्यांचा कृषी सेवा केंद्रावर होणाº्या गर्दीचा प्रश्न मिटणार आहे. या उपक्रमांतर्गत खते, बियाणे बांधावर मिळविण्यासाठी शेतकºयांना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील ६४२ गावांतील २१ हजार ९१८ शेतकºयांनी बियाण्यांसाठी आॅनलाईन नोंदणी केली. या शेतकºयांना विविध प्रकारचे एकूण ९७५४.४ क्विंटल बियाणे बांधावर पोहचविण्यात आले. यामध्ये सोयाबीन बियाणे ८८६६.५० क्विंटल, तूर बियाणे ४१९.८५ क्विंटल, कापूस १८.११ क्विंटल, मूग १५२.६१ क्विंटल, उडीद १९६.०५ क्विंटल, ज्वारी १०१.२८ क्विंटल अशा बियाण्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी दिली.