वाशिम : मालेगावात विद्यार्थ्यांनी काढली मतदार जनजागृती रॅली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 07:41 PM2018-01-25T19:41:20+5:302018-01-25T19:41:39+5:30
मालेगाव (वाशिम): राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून स्थानिक ना.ना. मुंदडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवार, २५ जानेवारी रोजी शहरात उत्स्फ ूर्त रॅली काढून मतदारांमध्ये जनजागृती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून स्थानिक ना.ना. मुंदडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवार, २५ जानेवारी रोजी शहरात उत्स्फ ूर्त रॅली काढून मतदारांमध्ये जनजागृती केली.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शासनाने ठरवून दिलेल्या आराखड्यानुसार मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने ना. ना. मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रॅलीव्दारे यासंबंधी जागर केला. या रॅलीचे संचालन मुख्याध्यापक वसंतराव अवचार यांनी केले. यावेळी ‘सारे काम छोड दो सबसे पहिले वोट दो’, ‘लोकतंत्र का भाग्यविधाता होता जागरूक मतदाता‘, ‘किसी के कहने से ना, वोट अपनी समझ से देना’, आदी स्वरूपातील घोषणा देत जनजागृती करण्यात आली. सदर रॅली अकोला फाटा येथून माळी वेटाळ, खवले वेटाळ, शिव चौक, गांधी चौकमार्गे तहसील कार्यालय येथे पोहचली. त्याठिकाणी तहसीलदार राजेश वजीरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी राजेश मोरे, राजेश कराळे, गोविंद डाखोरे, परमेश्वर नव्हाळे, सचिन देवळे, जया सोनुने, माया ठाकरे आदिंनी पुढाकार घेतला.