वाशिम अर्बनची आमसभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:23+5:302021-02-06T05:17:23+5:30
या आमसभेत बँकेचे मानद अध्यक्ष सुभाष राठी यांची प्रमुख उपस्थिती होत, तर सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सुरेश लोध होते. ...
या आमसभेत बँकेचे मानद अध्यक्ष सुभाष राठी यांची प्रमुख उपस्थिती होत, तर सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सुरेश लोध होते. यावेळी उपाध्यक्ष विष्णू सोनी, माजी अध्यक्षा तथा संचालिका शीला राठी, संचालक रमेशचंद्र बजाज, डॉ. राजकुमार हेडा, राधेश्याम हेडा, रमण अग्रवाल, राधेश्याम हेडा, सुधीर राठी, काईद जोहर शफाकत हुसेन, विजयकुमार दागडिया, विपीन बाकलीवाल, राजेश सिसोदिया, तसेच शाखा सभापती गोपाल काबरा (रिसोड), रतनलाल हुरकट (अनसिंग), मधुसूदन करवा (अमरावती), अरुण खारा, चंद्रशेखर बाजोरिया (यवतमाळ), नारायणदास भट्टड (उमरखेड), शंकरलाल अग्रवाल आणि महेंद्र भक्कड (जालना), तेजराव वानखेडे कर्मचारी प्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल खंडेलवाल आदींची उपस्थिती होती. मानद अध्यक्ष सुभाष राठी आपल्या मनोगतामधून ‘वाशिम बँक आज सक्षमपणे सर्वांच्या सहकार्याने सहकार क्षेत्रात अग्रगण्य बँक म्हणून कार्यरत आहे, असे म्हटले. राठी यांनी कोविड संसर्गजन्य रोगाची सुरुवात झाली असताना कठीण परिस्थितीत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कोविडयोद्धा म्हणून काम केल्याबाबत सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले, तर बँकेचे अध्यक्ष सुरेश लोध यांनी अहवाल वाचन केले. आमसभेत आय.एम.पी.एस. मोबाइल अॅपचे ग्राहकांच्या सुविधेकरिता राठी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी समता महेश अग्रवाल यांनी बँकिग क्षेत्रात सीएआयआयबी या विषयातील पदवी प्राप्त केल्याबाबत त्यांचा प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला, तर अकोला येथील विजय जयपिल्ले यांची अकोला महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबाबत पुष्पगुच्छ तथा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व विषय वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल खंडेलवाल यांनी, संचालन सहायक सरव्यवस्थापक श्रीराम करवा यांनी व आभारप्रदर्शन उपसरव्यवस्थापक राजेश काळे यांनी केले. सभेत भागधारक, हितचिंतक, कर्मचारीवृंदाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.