शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
5
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
6
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
7
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
8
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
9
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
10
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
11
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
12
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
13
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
14
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
15
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
16
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
17
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
18
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
19
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
20
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"

वाशिम अर्बनची आमसभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:17 AM

या आमसभेत बँकेचे मानद अध्यक्ष सुभाष राठी यांची प्रमुख उपस्थिती होत, तर सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सुरेश लोध होते. ...

या आमसभेत बँकेचे मानद अध्यक्ष सुभाष राठी यांची प्रमुख उपस्थिती होत, तर सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सुरेश लोध होते. यावेळी उपाध्यक्ष विष्णू सोनी, माजी अध्यक्षा तथा संचालिका शीला राठी, संचालक रमेशचंद्र बजाज, डॉ. राजकुमार हेडा, राधेश्याम हेडा, रमण अग्रवाल, राधेश्याम हेडा, सुधीर राठी, काईद जोहर शफाकत हुसेन, विजयकुमार दागडिया, विपीन बाकलीवाल, राजेश सिसोदिया, तसेच शाखा सभापती गोपाल काबरा (रिसोड), रतनलाल हुरकट (अनसिंग), मधुसूदन करवा (अमरावती), अरुण खारा, चंद्रशेखर बाजोरिया (यवतमाळ), नारायणदास भट्टड (उमरखेड), शंकरलाल अग्रवाल आणि महेंद्र भक्कड (जालना), तेजराव वानखेडे कर्मचारी प्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल खंडेलवाल आदींची उपस्थिती होती. मानद अध्यक्ष सुभाष राठी आपल्या मनोगतामधून ‘वाशिम बँक आज सक्षमपणे सर्वांच्या सहकार्याने सहकार क्षेत्रात अग्रगण्य बँक म्हणून कार्यरत आहे, असे म्हटले. राठी यांनी कोविड संसर्गजन्य रोगाची सुरुवात झाली असताना कठीण परिस्थितीत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कोविडयोद्धा म्हणून काम केल्याबाबत सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले, तर बँकेचे अध्यक्ष सुरेश लोध यांनी अहवाल वाचन केले. आमसभेत आय.एम.पी.एस. मोबाइल अ‍ॅपचे ग्राहकांच्या सुविधेकरिता राठी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी समता महेश अग्रवाल यांनी बँकिग क्षेत्रात सीएआयआयबी या विषयातील पदवी प्राप्त केल्याबाबत त्यांचा प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला, तर अकोला येथील विजय जयपिल्ले यांची अकोला महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबाबत पुष्पगुच्छ तथा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व विषय वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल खंडेलवाल यांनी, संचालन सहायक सरव्यवस्थापक श्रीराम करवा यांनी व आभारप्रदर्शन उपसरव्यवस्थापक राजेश काळे यांनी केले. सभेत भागधारक, हितचिंतक, कर्मचारीवृंदाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.