वाशिम जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांची इत्यंभूत माहिती मागविली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:24 PM2018-06-15T14:24:06+5:302018-06-15T14:24:06+5:30
वाशिम - अनुकंपाधारकांची इत्यंभूत माहिती वरिष्ठ स्तरावरून मागविली असून, त्याअनुषंगाने अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात येत आहे.
वाशिम - अनुकंपाधारकांची इत्यंभूत माहिती वरिष्ठ स्तरावरून मागविली असून, त्याअनुषंगाने अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात येत आहे. अचूक यादी बनविण्याच्या दृष्टिकोनातून १५ दिवसांच्या आत संबंधित अनुकंपाधारकांकडून आक्षेप मागविण्यात आले आहे. त्यानंतर अचूक प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे.
वाशिम जिल्हा परिषदेत जवळपास १५ विभाग असून, पंचायत समिती स्तरावरही विविध विभाग आहेत. प्रत्येक विभागात कर्मचाºयांची पदभरती करण्यासाठी शासनाकडून मंजूरी मिळालेल्या पदानुसार परीक्षा घेतली जाते. गत अडीच ते तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेत अनुकंपाधारकांची पदभरती करण्यात आली नाही. शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुकंपाधारकांची प्रतिक्षा यादी आॅनलाईन प्रसिद्ध करणे आता आवश्यक आहे. अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी अचूक बनविण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेतर्फे अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर कुणाचाही आक्षेप राहू नये म्हणून १५ दिवसांच्या आत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात संबंधित उमेदवारांवर पुराव्यासह आक्षेप नोंदविता येणार आहे. त्यानंतर सदर यादी अचूक बनवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.