जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूस नदीपात्रात मानोरा तालुक्यातील रुई-गोस्तादरम्यान पुलाची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पुलास खड्डे पडले आणि पुलातील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. शिवाय पुलास कठडेही नाहीत. गत आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे पूस नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यात २२ जुलै रोजी रात्रीनंतर आलेल्या जोरदार पावसामुळे पुलावरून पाणी वाहू लागले असून, ग्रामस्थांना आता पुलाचे पात्र नेमके दिसणेही कठीण झाले आहे. अशात ग्रामस्थ पुलावरील गुडघाभर पाण्यातून जीव धोक्यात घालत मार्गक्रमण करण्याची कसरत करीत आहेत. यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
-----
तीन दिवस वाहतूक ठप्प
गुरुवार, २२ जुलै रोजी झालेल्या महापुरामुळे रुई ते गोस्ता पूस नदीच्या पुलावर पूर्णपणे खड्डे पडले आणि गज उघडे पडले. पुलाच्या खालून वाहणारे पाणी आता पुलावरून वाहत असल्याने नागरिकांना ये-जा करण्यात अडचणी येत असून, सतत तीन दिवस या पुलावरील वाहतूक बंद होती. असे असतानाही संबंधित विभागाने या प्रकाराची दखल घेतली नाही. संभाव्य अपघाताची भीती लक्षात घेता, याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी रुई-गोस्ता येथील गावकऱ्यांकडून केली जात आहे.
250721\25wsm_1_25072021_35.jpg
पूस नदीच्या क्षतीग्रस्त पुलावरून वाहतेय पाणी !