काजळेश्वर, केनवड परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 04:02 PM2020-05-17T16:02:19+5:302020-05-17T16:02:34+5:30

नळ योजनेचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसाआड होत असल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.

Water scarcity in Kajleshwar, Kenwad area | काजळेश्वर, केनवड परिसरात पाणीटंचाई

काजळेश्वर, केनवड परिसरात पाणीटंचाई

Next

केनवड/काजळेश्वर : रिसोड तालुक्यातील केनवड आणि कारंजा तालुक्यातील काजळे्श्वर येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, नळ योजनेचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसाआड होत असल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.
केनवड : मेहकर ते मालेगाव मार्गावर वसलेल्या केनवड येथे ग्रामपंचायतच्या नळ योजनेद्वारा पाणीपुरवठा होतो. योग्य नियोजन नसल्यामुळे कधी १० व्या दिवशी तर कधी १७ व्या दिवशी नळ येतात. गावातील विहिरींनी तळ गाठल्याने ग्रामस्थांना एक ते दीड किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. तीन, चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल, एवढा जलसाठा विहिरीमध्ये आहे. परंतू, नियोजन नसल्यामुळे नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने गावकºयांना शेतातील विहिरींमधून पाणी आणावे लागत आहे. लहान मुलांसह महिला व आबालवृद्धांनादेखील दूरवरून पाणी आणावे लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.
काजळेश्वर उपाध्ये : येथील विहीरीत पाणीसाठा असूनही गावकºयांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. वीज भारनियमनामुळे जलकुंभ भरण्यास विलंब लागतो. याचा फटका गावकºयांना बसत आहे. महावितरणने विद्युत खांबावर तारजोडणी केली नाही. त्यामुळे पाण्यासाठी गावकºयांना वैताग झाला आहे. कुपनलिकेचा आधार घेत गावकरी, महिला पुरुष मे महिन्याच्या उकाडयात सकाळ, दुपार, रात्री या वेळेत गर्दी नसेल तेव्हा पाणी भरत असल्याचे दिसून येते. तर गुरांकरीता पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था महेंद्रा पाटील उपाध्ये आणि दिलीप पा. उपाध्ये या बंधूंनी त्यांच्या हौदावर केली आहे. मे महिन्यात पाण्यासाठी गावकºयांची गैरसोय होत असल्याने याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी महादेव टेलर जाधव यांनी १७ मे रोजी केली.

 
काजळेश्वरला पाणी पुरवठा करणाºया विहिरीवर स्वतंत्र रोहित्र मंजूर आहे. मात्र विद्युत खांबावर लॉकडाउनमुळे तार जोडणी बाकी आहे. येत्या तीन दिवसात महावितरणाकडून तार मिळेल व तारजोडणी झाल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा केला जाईल. 
नितीन पा. उपाध्ये
सदस्य ग्रामपंचायत काजळेश्वर.

Web Title: Water scarcity in Kajleshwar, Kenwad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.