शिरपूरजैन : बसस्थानक ते रिसोडफाटा या रस्त्याच्या विकास कामासाठी मागील कित्येक महिन्या पासून ८५ लाखाचा निधी मंजूर असूनही कामाला सुरुवात न झाल्याने परिसरात पावसाचे पाणी साचल्याने वाहन धारक, नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत. शिरपूर जैन येथे मागील कित्येक महिन्यापासून दुय्यम निबंधक कार्यालय इमारत, तलाठी कार्यालय इमारत, रिसोड फाटा े जैन धर्मशाळ या कामासह बसस्थानक ते रिसोड फाटा या तीन फर्लांग अंतराच्या रस्ता विकासकामासाठी ८५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत करण्यात येणार आहे. सध्या स्थितीत रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ, कै.कोंडबा तात्या ढवळे विद्यालय नजिक मोठमोठे खड्डे पडले आहेत तर बसस्थानक परिसरात ग्रामपंचायत समोर मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारक, नागरिक सह व्यापार्यांच्या दुकानावर ग्राहकांना व्यवस्थित जात येत नसल्याने कमी प्रमाणत होणार्या विक्रीमुळे व्यापारी सुद्धा त्रस्तझाले आहेत. त्यामुळे परिसरातील पाणी काढून देण्याची गरज असताना देखील याबाबत ग्राम पंचायत कुठलेही प्रयत्न करताना दिसत नाही तर बांधकाम विभाग रस्ता काम सुरु करण्यात उत्सुक नसल्याचे यावरुन दिसत आहे. या प्रकारामुळे मात्र नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबधितांनी याकडे लक्ष देवून या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे व नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी जोर धरत आहे.
रस्त्यावर साचले पाणीच पाणी!
By admin | Published: June 15, 2014 1:10 AM