प्रभाग क्रं १० मध्ये ही वाहिनी उघडी आहे. पाणी गटार मार्गे प्रभाग क्रं ७ मध्ये पुरविल्या जाते. पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यास अधिकारी बोलायला तयार नाही, काही लोकांनी ही बाब सांगितली असता पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण पाणीपुरवठा बंद केला आहे. परिणामी अनेक नगरात पाणी न गेल्याने हाहाकार होत आहे.
संघर्ष समितीने वार्ड क्रं ७ मध्ये पाहणी केली व नगरपंचायत गाठले तर मुख्याधिकारी नाही, त्यांची बदली झाली आहे. प्रभार कारंजा मुख्याधिकारी यांच्याकडे आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने मानोरा नगरपंचायत मधील विकासकामे थांबली असल्याचे दिसून आले. याबाबत तहसीलदार याची भेट घेऊन माहिती दिली जाईल,
व लवकरच मुख्याधिकारी रुजू न झाल्यास कार्यालयास कुलूप लावून निषेध केला जाईल. असा इशारा राठोड यांनी दिला.