लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा नगर पंचायतच्या नगराध्यक्षा बरखा अलताब बेग यांच्यावर नगरपंचायतच्या पंधरा नगरसेवकनी ११ मे रोजी जिल्हाधिकारी वाशिम यांच्या कडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता . यावर जिल्हाधिकारी यांनी विशेष सभा व चर्चेकरिता बुधवार, २० मे रोजी मानोरा नगरपंचायत येथे सभा बोलाविली. या सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.मानोरा नगर पंचायतच्या नगराध्यक्षा बरखा बेग यांच्यावर टाकण्यात आलेल्या अविश्वास मध्ये नगराध्यक्षा नगरसेवकांना विश्वासात घेत नाही , विकास कामे करत नाही विकासामध्ये अडचणी निर्माण करतात, नगर पंचायतची सभेची वेळ व माहीती न देता परस्पर ठरवितात , शासकीय योजनेचा लाभ जवळच्या लोकाना देतात अशा वेगगळ्या कारणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला .मानोरा नगर पंचायतवर सर्व पक्षीय नगरविकास आघाडीची सत्ता आहे . विद्यमान नगराध्यक्षा ह्या याच आघाडीच्या नगराध्या म्हणुन आॅगष्ट १८ मध्ये विराजमान झाल्या होत्या , परंतु सर्वक्षीय आघाडीच्या नगरसेवकांना विकास कामात विश्वासात घेत नसल्यामुळे नगरसेवक त्यांच्या विरोधात उभे ठाकले. मानोरा नगरपंचायतची सदस्या संख्या सतरा आहे.त्या पैकी पंधरा नगरसेवक त्यांच्या विरोधात गेले आहे . नगराध्यक्षांवर टाकण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर नगरसेवक अमोल प्रकाश राऊत, रेखाताई श्यामराव पाचडे , छाया गुणवंत डाखोरे , शेख फिरोजाबी शेख मुस्ताक , , शेख आबेदाबी नाजीम, सुनेहरा परविन वहिदोदीन शेख, सुनिता संतोष भोयर , ऊषाताई शेरसिंग जाधव , शेख वहीद शेख अयुब , एहफाज शहा मेहबुब शहा , ज्ञानेश्वर विठ्ठल गोतरकर, मंजुषा महेश निशाने, हसिनाबी जब्बार शहा , अहमद बेग चांद बेग , गणेश परशराम भोरकडे आदीच्या स्वाक्षरी आहेत. २० मे रोजी सभा आटोपल्यानंतर नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल होतो की बारगळतो समजणार आहे.
नगरसेवकांचे जाणून घेणार मते अविश्वास प्रस्तावाबाबत चर्चा करुन तहसीलदार नगरसेवकांची मते जाणून घेणार आहेत. नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतरच अविश्वास पारीत केल्या जाणार असल्याने तो पारीत होतो की बारगळतो याकडे नगर पालिका वर्तुळातील संबधितांचे लक्ष लागले आहे.नगरसेवकांच्या खोट्या कामाना मंजुरी न दिल्यामुळे माझ्याविरूध्द अविश्वास दाखल करण्यात आला असल्याची प्रतिक्रीया नगराध्यक्ष बरखा अल्ताब बेग यांनी व्यक्त केली आहे.