नाली बांधकाम केव्हा होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:43 AM2021-05-07T04:43:13+5:302021-05-07T04:43:13+5:30
जवळपास पाचशे कोटी रुपये खर्च करून मालेगाव, शिरपूर, रिसोड, सेनगाव,हिंगोली हा ९७ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला. या ...
जवळपास पाचशे कोटी रुपये खर्च करून मालेगाव, शिरपूर, रिसोड, सेनगाव,हिंगोली हा ९७ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला. या महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मालेगाव ते रिसोड काम करणारी संबंधित कंपणी गाशा गुंडाळून निघून गेली आहे; मात्र काही ठिकाणी कामे बाकी ठेवली आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिरपूर जैन येथील जंक्शनच्या ठिकाणी पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाली बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता पावसाळा अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपला आहे आणि संबंधित कंपनीने हे काम केले नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होताच जंक्शन परिसरातील नाली बांधकामअभावी मोठी समस्या निर्माण होणार आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरण्याची भीतीही वर्तविली जात आहे. नाली बांधकामाविषयी शिरपूर येथील नागरिकांनी वेळोवेळी रस्ता प्राधिकरणाचे उपअभियंता चौधरी व ठेकेदाराचे प्रोजेक्ट मॅनेजर दीपक कनोजे यांना विचारले असता, एखाद्या दिवशी पोलीस संरक्षण घेऊन अतिक्रमण हटवू व नाली बांधकाम करू, असे सांगितले होते; मात्र त्यांनी यापैकी काहीही केले नाही.