वन्य प्राणी करताहेत पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:09 AM2021-07-13T04:09:28+5:302021-07-13T04:09:28+5:30
शेतकरी शेतात दिवसभर काम करतात. रात्री वन्य प्राणी रोही पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत आहेत. वारंवार वन ...
शेतकरी शेतात दिवसभर काम करतात. रात्री वन्य प्राणी रोही पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत आहेत. वारंवार वन विभागाकडे तक्रारी केल्या तरी काही फरक पडत नाही. शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून महागडे बियाणे, खते खरेदी केले व काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीसाठी बियाणे, खते, औषधी खरेदी केली व शेतकऱ्यांनी पेरणी व लावगड केली. आता अंकुर जमिनीतून बाहेर निघाले असून, अंकुर पिकांची वाढ होत असताना वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करीत आहेत. प्रचंड महागडे बियाणे पेरले. त्यातच वन्य प्राण्यांचा त्रास वाढला; पण वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त केला नाही. आता सतत वन्य प्राणी पिकांची नासाडी करीत आहेत. शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.