तालुक्यात वन विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात जंगल असून, चहुबाजूने जंगलाने वेढलेल्या या तालुक्यामधून राष्ट्रीय, राज्य आणि इतरही मार्ग गेले आहेत. वनहद्दीतून जात असलेल्या मार्गावर वाहनांच्या धडकेत अनेक वन्य प्राणी ठार होत असल्याच्या दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत.
त्यात वन पर्यटन केंद्राजवळून जात असलेल्या मानोरा दिग्रस राष्ट्रीय महामार्ग १६१ ए वर शुक्रवारी सकाळी पोहरादेवीकडून पंचाळाकडे महामार्ग ओलांडताना गट नंबर ४३५ मध्ये सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत रानडुक्कर जागीच ठार झाल्याची घटना घडली.
-
कोट : मानोरा दिग्रस राष्ट्रीय महामार्ग जात असलेल्या वन हद्दीमध्ये वाहनांच्या धडकेने वन्य प्राणी आणि वन्य प्राण्यांच्या धडकेने वाहन चालकांना इजा होऊ नये, यासाठी मानोरा आणि दिग्रस या दोन्ही बाजूने वन प्रशासनाने सावधानतेचे फलक तातडीने लावण्याची सोय करावी. - उमेश राठोड, सरपंच वाईगौळ