रूग्णवाहिकेतच झाली महिलेची प्रसुती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:37 PM2018-06-12T17:37:27+5:302018-06-12T17:37:27+5:30
रिसोड : शासकीय रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना १२ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासन व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला.
रिसोड : शासकीय रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना १२ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासन व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला.
रिसोड येथील मोमिनपुरा भागातील रफिया बी या महिलेस त्यांच्या नातेवाईकांनी दुपारी १२ वाजता रिसोड ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीकरिता आणले होते. येथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वाशिम येथे जाण्याचा सल्ला दिला. याकरिता नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाºयांना रूग्णवाहिकेची मागणी केली. गाडीचे काम सुरू आहे, असे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. दुपारी तीन वाजेपर्यंत रूग्णवाहिकेचा बंदोबस्त झाला नव्हता. मात्र ३ वाजता रूग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर, सदर महिलेला नातेवाईकांसोबत या रूग्णवाहिकेद्वारे वाशिमला घेऊन जाण्यासाठी निघाले असता काही अंतरावरच महिलेची प्रसूती झाली. सदर रूग्णवाहिका परत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आली. परत आल्यानंतर रुग्णालयात कोणताही कर्मचारी किंवा नर्स उपस्थित नव्हते. वैद्यकीय अधिकाºयाने बाहेरच त्या महिलेस बघितले व तिथून निघून गेले. रुग्णालयात फक्त एक परिचारिका उपस्थित होती. तीदेखील दुसºया एका महिलेची प्रसुती करीत होती, असे रूग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. रुग्णालयातील एका सफाई कर्मचाºयाने या महिलेस घेऊन वार्डमध्ये शिफ्ट केले, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या रूग्णवाहिकेच्या चालकाने धावपळ करत दुसºया एका परिचारिकेला बोलावून घेतले व पुढील काम बघितले.
यासंदर्भात रुग्ण महिलेचा भाऊ रज्जाक बेग म्हणाला की, मंगळवारी दुपारी मी माझ्या बहिणीला इतर नातेवाईकांसोबत घेऊन प्रसूतीकरिता ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाºयांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही व आम्हास खूपच त्रास सहन करावा लागला. मात्र रूग्णवाहिकेच्या चालकाने आम्हाला चांगले सहकार्य केले, असे रज्जाक यांनी सांगितले. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नसल्याने संपर्क झाला नाही.